रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप,मांडवी या सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार 24 व बुधवार 25 जून रोजी करण्यात आली.
इंद्रजित रघूविर कुमार(38),रवि मेघनाथ कुमार (24,दोन्ही रा.रसाळवाडी शांतीनगर,रत्नगिरी),राम प्रवेश शारदा शर्मा(37,रा.रसाळवाडी शांतीनगर,रत्नागिरी),मिथून मोहन गार्डी (21,रा.क्रांतीनगर,रत्नागिरी),ओमकार रविंद्र सुर्वे(27,रा.वरचा फगरवठार,रत्नागिरी),श्रीराम मनोज गावडे(25,रा.जाकिमिर्या),रामविर नंदलाल चव्हाण(28,रा.खडपे वठार,रत्नागिरी),श्रवणकुमार बाबुलाल चव्हाण(26,रा.खडपेवठार),फ्लेविन इनाशिव डिसोझा(32,रा.जेलरोड,रत्नागिरी),स्वरुप संजय नरवणकर (30,रा.झाडगाव,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 10 जणांची नावे आहेत. हे सर्वजण त्यांच्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे