रत्नागिरीत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या दोघांवर गुन्हा  

रत्नागिरी:- शहरातील नगर परिषद इमारतीच्या लगत असलेल्या पडक्या जागेमध्ये अवैधरित्या दारू पिणाऱ्या दोघांवर शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी 4 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आल़ी. रफत करीम फणसोपकर (22) व ताहीर रफिक कोतवडेकर (22, ऱा दोन्ही राजीवडा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़.

 पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित आरोपी हे नगर परिषद इमारतीलगत असलेल्या पडक्या जागेत अवैधरित्या दारू पित होत़े. ही बाब शहर पोलिसांच्या निदर्शनास आल़ी. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल केल़ा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.