रत्नागिरीत विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील काद्री आईस ऍण्ड कोल्ड स्टोअरेज फॅक्टरीच्या टेरेसवर जात असताना एमएसईबीच्या वायरला त्याचा स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागून वायरमनचा मृत्यू झाला. इम्रान अबू बासर हसन (२०, रा. प. बंगाल, सध्या पेठकिल्ला रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

इम्रान हा आईस ऍण्ड कोल्ड स्टोअरेज या फॅक्टरीत वीस फूटी कॉकपॅनल दोरीच्या सहाय्याने फॅक्टरीच्या टेरेसवर खेचत होता. कॉक पॅनललला ऍल्युमिनियमचा पत्रा असल्याने सदरचा पफ बॅनेल फॅक्टरीच्या टेरेसच्या बाजूला असलेल्या १० फूट अंतरावर असलेल्या एमएसईबीच्या वायरला स्पर्श झाला. त्यामुळे इम्रान याला शॉक लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता मृत घोषित करण्यात आले.