रत्नागिरी:- भर दिवसा वर्दळीच्या रस्त्यावरून अज्ञाताने दुचाकी लांबवली. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ७.१५ वा. कालावधीत घडली आहे. या बाबत जयेश सुहास मयेकर यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा. सुमारास ते मारुती मंदिर येथील साईश्वरी हॉटेल समोर आपली ॲक्टिव्हा दुचाकी (एमएच-०८-एके-६६०१) पार्क करून हॉटेलमध्ये गेले होते. त्याठिकाणी चहा पिऊन ते ७.१५ वा. सुमारास बाहेर आले असता त्यांना आपली दुचाकी आढळली नाही. त्यांनी आजुबाजुच्या पार्किंगमध्ये आपल्या दुचाकीचा शोध घेतला परंतु त्यांना दुचाकी मिळून आली नाही. आपली दुचाकी कोणीतरी नजर चुकीने घेउन गेला असेल असा समज करुन ते दुचाकीचा शोध घेत होते. परंतुदुचाकी मिळून न आल्याने आपली दुचाकी चोरीसच गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मंगळवार, दि. ५ मार्च रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.