रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात सध्या दुचाकी चोरीचे सत्र सुरू झाले आहे. शहरातील आठवडा बाजार येथून दुचाकी लांबवली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 20 डिसेंबर रोजी दुपारी 3 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत ओंकार विश्वनाथ साळवी (31, रा. फणसोप, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,सोमवार 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वा. त्यांनी आपली युनिकॉर्न दुचाकी (एमएच- 08-टी- 5832) नवलाई ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये पार्क केली होती.दुसऱ्या दिवशी ते आपली दुचाकी घेण्यासाठी गेले असता त्यांना आपली दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूला दुचाकीचा शोध घेतला परंतु ती मिळून न आल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.