रत्नागिरीत टीआरपी येथे ब्राऊन शुगर सदृश्य अंमली पदार्थ जप्त 

रत्नागिरी:-रत्नागिरी शहरानजिक टीआरपी येथे गस्ती दरम्यान 3.34 ग्राम वजनाचा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. हा अमली पदार्थ ब्राऊन शुगर असल्याचा संशय पोलिसांना आहे. ब्राऊन शुगरसह एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 

अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस अधीक्षक डॉ.मोहीत कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जुन रोजी रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ऑलआऊट ऑपरेशन आयोजीत करण्यात आले होते. या कालावधीत जास्तीत जास्त कारवाई करण्याचे आदेश मा.पोलीस अधीक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांनी दिले होते. या ऑल आऊट ऑपरेशनवेळी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार गस्त करीत असताना हातखंबा ते रत्नागिरी जाणारे रोडवर टीआरपी रत्नागिरी येथील कोकण रेल्वे ब्रीजचे अलिकडे आरोपी फैजान निसार हाजू , याचेकडून प्लास्टिक पिशवीसह ३.३४ ग्रॅम हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. 

सदर पदार्थ हा ब्राऊन शुगर या प्रकारातील अंमली पदार्थ असल्याचा संशय पोलिसांनाआहे. अंमली पदार्थ व अन्य मुद्देमाल असे एकूण रुपये 41 हजार 930 इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये संशयित अंमली पदार्थाची किंमत 31 हजार 850 आहे.  ३१,८५० / – आहे. पोहेकॉ शांताराम रामचंद्र झोरे यांच्या तक्रारीवरुन रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे आरोपी फैजान निसार हाजू (वय २६) याचेविरुध्द भादवि ८ ( क ) , २२ ( अ ) एन.डी.पी.एस.ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. 

या व्यतिरिक्त सदर ऑल आउट ऑपरेशन दरम्याने अवैध दारु विरोधात खेड पो.ठाणे येथे १, सावर्डे पो.ठाणे येथे १, जयगड पो.ठाणे येथे १. पूर्णगड पो.ठाणे येथे १ असे एकूण ४ गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध दारुसह एकूण २,३४५ / -रु.ची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे . तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस ठाणे मिळून एकूण विना मास्कच्या ६५ केसेस , अत्यावश्यक सेवा नियमांचे उल्लंघन केल्याच्या ६ केसेस , मो.वाहन कायद्याखाली २ ९ ३ केसेस करण्यात आलेल्या असून रेकॉर्डवरील १ ९ हिस्ट्रीशिटर चेक करण्यात आले असून लॉजेसची तपासणी केली आहे .