रत्नागिरी:– अनैतिक व्यापाराचे लोन आता रत्नगिरी सारख्या सुसंस्कृत शहरातही पोहचले आहे. शहरातील उच्चभ्रु वस्ती असलेल्या शिवाजीनगर येथील सिद्धीविनायक नगर येथे फ्लॅटमध्ये बाहेरून मुली आणूण त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेणार्या राजेंद्र रमाकांत चव्हण याच्या विरोधात शहर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सिद्धीविनायक नगर येथे फ्लॅटमध्ये वेश्याव्यावाय सुरु असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली होती. गुरुवारी दुपारी २.२० वाजण्यासुमारास पोलिसांनी सिद्धीविनायक नगर येथील त्या फ्लॅटवर छापा टाकाला. यावेळी बंद करुन ठेवलेल्या फ्लॅटमध्ये संशयास्पदरित्या राहणार्या मुली आढळून आल्या. त्याकडे पोलीसांनी विचारणा केल्यानंतर राजेंद्र रमाकांत चव्हाण हा मुलीना आणून त्यांच्याकडून वेश्याव्यावसाय करुन घेत असल्याचे उघड झाले आहे.
त्यानंतर शहर पोलीसांनी राजेंद्र रमाकांत चव्हाण याच्या विरोधात भादंविक ३७० व अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ नुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. सुमारे दिड वर्षांपुर्वी शहरातील ओसवालनगर येथे अशाच प्रकारचा अनैतिक व्यापार करणार्या दोघांना पोलीसांनी छापा टाकून अटक केली होती. त्यानंतर असे प्रकार थांबले होते. मात्र आता थेट उच्चभ्रुवस्ती असलेल्या सिद्धीविनायक नगर येथील फ्लॅटमध्ये अशी घटना उघड झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.
सिद्धीविनायक नगर येथील परिसर सीसीटिव्हीच्या निगराणीखाली आहे. त्यामुळे गेल्या काहि दिवसात फ्लॅटवर कोण कोण गेले होते. हे पोलीसांच्या तपासात उघड होण्याची शक्यता आहे. मात्र शहर पोलीस या प्रकाराच्या मुळापर्यंत जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.