रत्नागिरी:- वडिलांच्या मित्रांच्या नावे तब्बल 10 लाख रुपये मागवून घेउन रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना बुधवार 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वा.सुमारास घडली आहे.
दीपक व अन्य दोन अज्ञात (सर्व रा.चांदणी चौक,दिल्ली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात मुकेश सुरेश गुंदेचा (रा.खेडशी,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांच्या वडिलांचे मित्र हसमुख जैन (रा.दापोली) यांच्या सांगण्यावरुन त्यांनी प्रकाश धारीवाल (रा.पूणे) यांना 10 लाख रुपयांची गरज असल्याने दिल्ली येथे दिपक नामक व्यक्तीकडे पैसे मागवून घेतले. त्याप्रमाणे फिर्यादी मुकेश गुंदेचा यांनी पैसे पाठवून दिले. काही कालावधीनंतर हे सर्व पैसे राजापूर येथील नवीन धारीवाल हे फिर्यादींना परत आणून देण्याचे ठरले होते.
परंतू ठरलेल्या मुदतीत फिर्यादी सुरेश गुंदेचाला पैसे न मिळाल्याने वडिलांचे मित्र हसमुख जैन यांनी प्रकाश धारीवाल यांना दुसर्या मोबाईलवर फोन केला असता त्यांनी आपण पैसे मागितलेच नसल्याचे हसमुख जैन यांना सांगितले. त्यामुळे प्रकाश धारिवाल व नवीन धारिवाल यांच्या नावाचा वापर करुन संशयितांनी फिर्यादीची 10 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी संशयित तिघांविरोधात भादंवि कायदा कलम 420,406,419,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.