रत्नागिरी:- शहरातील वरची आळी येथील पडक्या घराच्या पाठीमागे विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत साहित्यासह ३८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित विनोद वर्तक (वय ४०, रा. शिरगाव-मयेकरवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २२) दुपारी दोनच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना मटक जुगार खेळ खेळवत असताना सापडला. त्याच्याकडून ३८३ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.