रत्नागिरी:- शहरातील तारांगण क्रीडा संकुल जवळ पार्क करून ठेवलेल्या ट्रकच्या बॅटऱ्या अज्ञाताने लांबवल्या. ही घटना 2 मार्च रोजी रात्री 10 ते 3 मार्च रोजी सकाळी 8 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत ट्रक मालक महम्मद जैनुद्दीन वस्ता (42,रा.बोर्डिंग रोड, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,त्यांनी आपल्या मालकीचा 10 टायर असलेला (एमएच-08-एच-1595) तारांगण क्रीडा संकुल जवळ उभा केला होता. अज्ञाताने या संधीचा फायदा उठवत ट्रकच्या बॅटरी कव्हर वाकवून तोडून बॅटरी चोरून नेल्या.