रत्नागिरी:- महाराष्ट्र लोकाधिकार समितीने रत्नागिरीत एका बागायतदार शेतकर्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मंगळवारी मोठा एल्गार केला. शहरानजिकच्या टेंभ्ये गावातील खाडेवाडीत राहणार्या मनोहर पांडुरंग खाडे यांच्या घराला कर्जापोटी बँकेने वर्षभरापूर्वी लावलेले सील तोडले. त्यांच्या कुटुंबियांचा पुन्हा गृहप्रवेश करून घेतला. गेले दिड- दोन वर्षे या कारवाईमुळे गोठ्यात वास्तव्यास असलेल्या या कुटुंबाला घर वापसी करून दिली.
रत्नागिरी शहरानजिकच्या टेंभ्ये गावात राहत असलेले मनोहर खाडे यांचे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून आंबा व्यवसायासाठी अर्थसहाय्य घेतले होते. त्याबाबतचे केलेले व्यवहार नियमाधिन ठेवलेले होते व आहेत. अशा घेतलेल्या अर्थसहाय्याची वेळोवेळी कर्ज रकमेच्या कितीतरी अधिकपटीने परतफेडही केलेली होती. पण अशा भरलेल्या रक्कमा आपल्या बँकेने व्याज व इतर खर्च यामध्ये वळत्या करुन मुद्दल तशीच ठेवण्याचा प्रकार केलेला असल्याची कैफियत त्यांनी महाराष्ट्र लोकाधिकारी समिती रत्नागिरी जिल्हा यांच्याकडे कथन केली. त्याबाबतचे सर्व ऐवजही त्यांनी या समितीकडे सादर केले.
अवाजवी रकमेची वसुली बेकायदेशीर पध्दतीने करत असल्याची तक्रार मोहन खाडे यांनी बँकेकडे देखील मांडली होती. पण पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करन बेकायदेशिरपणे स्वतःचे अधिकार गैरतर्हेने वापरून माझ्या अज्ञानाचा व असहाय्यतेचा गैरफायदा घेण्यात आला. जिल्हादंडाधिकारी न्यायालयाला माझेबाबत खोटी दिशाभुल व दिशाहिन करणारी माहिती देत माझी मालमत्ता बेकायदेशीरपणे हडप करण्याचा प्रयत्न चालविला असलेबाबत त्यांनी लेखी तक्रार सरफेसी कायद्याअंतर्गत दि. 21/01/2012 रोजी केलेला आदेश त्याची दि. 24/02/2022 रोजीच्या पत्राने बेकायदेशीर अंमलबजावणी करण्याचा चालु असलेल्याबाबत दिली होती.
वस्तुतः आंबा व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाला माझे घर बेकायदेशीरपणे तारण दाखवले आहे. ही बाब चुकीची असल्याकारणाने शेतकर्यांवर ही बाब अन्याय करणारी आहे. न्यायालयाला दिशाभुल करणारी माहिती देऊन अशा माहितीच्या आधारे खाडे यांच्या विरोधात एकतर्फी आदेश मिळवून त्याची अंमलबजावणी बेकायदेशीर पध्दतीने करण्याचा व त्यातुन त्यांची मिळकत तबदिल करण्याचा बेकायदेशीर प्रयत्न चालविला आहे. हे चुकीचे असुन खाडे यांच्यावर अन्याय करणारे आहे. असा चाललेला प्रकार म्हणजे सावकारी चालविल्यासारखे आहे. हि बाब गंभीर, अन्यायकारक तसेच शोषण करणारे असल्याचे महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी सांगितले.
त्यामुळे या अशा चाललेल्या प्रयत्नांमुळे खाडे कुटुंबिय मानसिक, शारिरिक खाली वावरत होते. बँकेने प्रशासनामार्पत त्यांच्या घराला कर्जापोटी सील करण्याची कारवाई सुमारे दिड वर्षापूर्वी केलेली होती. त्यामुळे हे कुटुंबिय वाडीत एका गोठ्यात वास्तव्यास होते. मोहन खाडे हे खाडेवाडी येथील पमुख मानकरी आहेत. त्यांच्यावर अशाप्रकारे झालेल्या अन्यायाने त्यांचे शेजारी देखील हतबल झालेले होते. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकाधिकार समितीने मंगळवार 12 सप्टेंबर रोजी एल्गार पुकारला होता. रत्नागिरीत आंबडेकर स्मारक भवन येथे यासंदर्भात समितीचे पदाधिकारी, बागायतदार संघटना, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक झाली, त्याठिकाणी खाडे कुटुंबियांवर झालेल्या अन्यायकारक कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला.
त्यानंतर महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे सारे पदाधिकारी महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. पसाद करंदीकर यांच्या नेतृत्वाखाली टेंभ्ये येथे रवाना झाला. त्यापूर्वी येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकर पुतळा, लोकनेते शामराव पेजे पुतळा, छ.शिवाजी महाराज पुतळा यांना अभिवादन करून ही सारी मंडळी मार्गस्थ झाली. टेंभ्ये येथील खाडेवाडीत जाताच या साऱयांचे मोहन खाडे व त्यांचे कुटुंबिय, शेजारी यांनी जोरदार स्वागत केले. खाडे यांच्या घराला अन्यायकारकरित्या लावलेले सील सर्वांसमक्ष तोडण्यात आले आणि खाडे कुटुंबियांची घरवापसी करण्यात आली. त्यावेळी मोहन खाडे व त्यांचे कुटुंबिय अगदी गहिवरून आले होते. गणेशोत्सवापूर्वी आपल्या घरात झालेल्या पुर्नपवेशाने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. या घर वापसी न्याय आंदोलनावेळी ॲड. पसाद करंदीकर यांच्यासमवेत प्रमुख मार्गदर्शक ॲड. आप्पासाहेब घोरपडे, जिल्हाअध्यक्ष अनंत शिंदे, मोहसिन खाटीक, रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोहिते, आंबा बागायतदार संघटनेचे पकाश उर्फ बावा साळवी आदींची उपस्थिती होती.