रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या आणखी एका वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. शहरातील नाचणे आय. टी. आय. रोडवरील एका इमारतीत धाड टाकून पोलिसांनी पीडित मुलीसह दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली. नाचणे रोडवरील आय.टी.आय. येथील एका बिल्डींगमधील फ्लॅटमध्ये हा प्रकार सुरू होता. फ्लॅटमध्ये मुलींना बेकायदेशीररित्या ठेवून हा अनैतिक व्यवसाय चालू आहे अशी खबर रत्नागिरी शहर पोलीसाना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी या ठिकाणी बोगस गि-हाईक पाठवून हा प्रकार उघड केला. अनैतिक व्यवसाय चालू आहे याची खात्री पोलिसांना झाल्यानंतर पोलीसांनी छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी तिथे एक पिडीत मुलगी व तिचेकडून वेश्या व्यवसाय करुन घेणारा इसम असे दोघेजण मिळून आले. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीसांनी सदर इसमाकडे चौकशी केली असता त्याचे नाव रावसाहेब जगन्नाथ माळी ( ४२, मूळ रा. सांगली ) असून त्याच्या सोबत एका स्त्री साथीदाराचा देखील समावेश आहे. हे दोघे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता मुलींना बेकायदेशीररित्या आणून व गि-हाईक आणून, वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलीसांनी रावसाहेब माळी व त्याची एक स्त्री साथीदार यांच्या विरुध्द शहर पोलीस ठाणे येथे रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.कलम ३७०, ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ३ , ४ , ५ अन्वये गुन्हा करुन दाखल करुन रावसाहेब माळी यास दाखल गुन्ह्यात अटक केली आहे . तसेच पिडीत मुलीस महिला पोलीस अधिकारी व स्टाफ यांनी ताब्यात घेतले आहे.
सदर कारवाई मा . पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे , रत्नागिरी, पोलीस निरीक्षक अनिल लाड, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. एम.एस.भोसले, परि. म.पो.उ.नि. मेहेर, पो.हवा. जाधव, पो.ना. नार्वेकर, पो.ना. सावंत, पो.ना. सावंत, म.पो.ना. गुरव, म.पो.शि. नाटेकर, म.पो.शि.मलबारी यांनी केली.