रत्नदुर्ग किल्ल्याजवळ गांजा ओढणाऱ्या तरुणाला अटक

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याच्या बाजूला, मोबाईल टॉवरच्या खाली एका तरुणाला गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई ०३ मे २०२५ रोजी रात्री ९ वाजून ०५ मिनिटांच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ/१४४७ पंकज यशवंत पडेलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमिज अब्दुल हमीद मस्तान (वय २८) हा रत्नदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या मोबाईल टॉवरच्या खाली आडोशाला बसून बेकायदेशीरपणे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करत असताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपी रमिज अब्दुल हमीद मस्तान याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.