मौजे कळझोंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाड्याचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील मौजे कळझोंडी येथे बिबट्याचा राजरोसपणे वावर चालू असून काल दिनांक १४ रोजी सकाळी सहाच्या सुमारास या ठिकाणी चरायला गेलेल्या जनावरांच्या कळपावर हल्ला करून एका गाईच्या दोन वर्षाच्या पाड्याला ठार मारल्याने या ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले आहे.

मौजे कळझुंडी येथील शेतकरी श्री किशोर रामचंद्र पवार यांच्या मालकीची पाळीव जनावरे स्वतः किशोर पवार हे सकाळी सहा वाजता कळझोंडी येथील माळरानावर चाऱ्याला घेऊन गेले असता या ठिकाणी दबा धरून बसलेल्या सदरच्या जनावरांच्या कळपावर हल्ला केल्यानंतर यामध्ये सुमारे दोन वर्षाचा गायीचा बछडा मृत्युमुखी पडला असून या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .

शेतकरी किशोर रामचंद्र पवार यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात असेल मुक्त वावर असणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मौजे काळझोंडी येथून होत आहया घटनेची खबर मिळताच मौजे कळझोंडी गावच्या सरपंच सौ दीप्ती वीर उपसरपंच प्रकाश पवार व सुभाष पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.

वनविभागाचे अधिकारी श्री एस एस गावडे पशुवैद्यकीय अधिकारी श्री डॉक्टर काळे व त्यांचे सहकारी श्री अलकुंटे यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी या घटनेची दखल घेत सदरच्या परिसराची पाहणी केली.

सदरच्या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा अशी मागणी मौजे काळझोंडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात अनेक शेतकऱ्यांची पाळीव जनावरे बिबट्याने मारली असल्याचे त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे.

त्यामुळे काल झालेल्या घटने नंतर पुन्हा एकदा मौजे काळजोंडी येथे भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर मुक्त फिरत असणाऱ्या बिबट्याचा वनविभाग कसा बंदोबस्त करते याकडे कळझोंडीवासी यांचे लक्ष लागून राहिले आहे.