रत्नागिरी:- शहरातील अंगण प्लाझा येथील येथील मोबाईल शॉपीचे ५ हजार रुपयाचे दोन सी.सी.टी.व्ही कॅमेरे लांबवले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना गुरुवार २३ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० ते १ वा.सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत अनिकेत रामभाउ लाकडे (३१, रा.सहकार नगर नाचणे, रत्नागिरी ) यांनी शहर पोलिसांकडे सोमवार २७ सप्टेंबर रोजी तक्रार दिली आहे. त्यानूसार, त्यांची अंगण प्लाझा बिल्डिंगमध्ये अनिकेत नावाची मोबाईल शॉपी आहे. या शॉपी बाहेर लावण्यात आलेले दोन हिक्विीजन कंपनीचे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे अज्ञाताने लांबवले. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले करत आहेत.