मोबाईलवर लिंक पाठवून महिलेची २५ हजारांची फसवणूक

चिपळूण:- शहरातील गोवळकोट रोड येथील एका महिलेला मोबाईलवर लिंक पाठवून अज्ञाताने २५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

संबंधित महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवून एक लिंक देण्यात आली. या लिंकवर क्लिक केल्यानंतर महिलेच्या बँक खात्यातून सुरुवातीला पाच हजार रुपये काढण्यात आले. यानंतर एकूण २५ हजार रुपये या महिलेच्या बँक खात्यातून गेल्याचे लक्षात आल्यानंतर तिला आपण फसल्याची जाणीव झाली. त्यानंतर तिने चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.