रत्नागिरी:- शहरातील आरोग्यमंदीर येथे मैत्रिचा फायदा उठवत दागिने चोरणाऱ्या महिलेला शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली. नंदीनी मोहीते (रा. टिके सध्या अभ्युदयनगर रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी तिला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने नंदीनी हिची रवानगी पोलीस कोठडीत केली.
कोमल श्याम पाटील (३२, रा. आरोग्य मंदीर रत्नागिरी) यांनी याप्रकरणी चोरीची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल व नंदीनी यांच्यात मैत्रिचे संबंध होते. यातून कोमल हिच्या आरोग्यमंदीर येथील फ्लॅटची चावी नंदीनी हिने मिळविली होती. माहे ऑक्टोबर २०२२ ते २६ नोव्हेंबर २०२२ दरम्यानच्या काळात नंदीनी हिने कोमल हिच्या घरातील ६ तोळे सोन्याचे मंगळसूत्र व ६० हजार रूपयांची रोकड चोरून नेली. अशी माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली आहे.
त्यानुसार पोलिसांकडून नंदीनी हिच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच तिच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.|