रत्नागिरी:- माझ्या मैत्रिणीबरोबर फोनवर बोलू किंवा मेसेज करु नकोस असे का सांगतोस अशी विचारणा केल्याच्या रागातून एकाला जबर मारहाण केली. ही घटना मंगळवार 16 एप्रिल रोजी दुपारी 1 वा.सुमारास राजीवडा पुलाजवळील बंदरावर घडली आहे.
रमजान मिरकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात इक्बाल आदम म्हस्कर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रमजान मिरकरने इक्बाल म्हस्कर यांच्या मुलाला तू माझ्या मैत्रिणीशी फोनवर बालू किंवा मेसेज करु नकोस असे सांगितले होते.
याबाबत त्याने रमजानकडे विचारणा केली असता त्याचा राग रमजानला आहे. त्या रागातून त्याने इक्बाल म्हस्कर यांच्या मुलाला शिवीगाळ करत हातांच्या थापटांनी तसेच लोखंडी सळीन डोक्यावर, पाठीवर उजव्या पायाच्या तळव्यावर मारहाण केली. तसेच तू पुन्हा तिच्याबरोबर बोललास तर तुला पुन्हा मारेन अशी धमकीही दिली. याप्रकरणी संशयिताविरोधात भादंंवि कायदा कलम 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा