चिपळूण:- उंदीर मारण्याचे औषध प्यायलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयश्री विजय मोहिते (२७, आकले) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबतची खबर विजय भगवान मोहिते यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय मोहिते व जयश्री मोहिते यांचा २०१७ रोजी विवाह झालेला आहे. जयश्री यांना मूल होत नसल्याने त्या नेहमी दबावाखाली असायच्या. २४ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उंदीर मारण्याचे औषध प्यायल्याने त्यांना उपचारासाठी दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते. अधिक उपचारासाठी त्यांना डेरवण रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचे २५ रोजी सकाळी ९.४६ वाजता निधन झाले.









