मुलीची छेड काढल्याचा रागातून तरुणाला मारहाण

देवरुख:- मुलीची छेड काढल्याचा राग मनात धरून चार जणांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली असून यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चार जणांवर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही जणांना अटक करून गुरूवारी देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत, राजू पवार (मूळ गाव राजस्थान, सध्या रा. पाटगाव) असे जखमी तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी मंगेश कांबळे, मंगेश्वर भाटकर, साहील रसाळ, नागेश कदम यांच्यावर देवरूख पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत पवार याने चार दिवसांपूर्वी एका मुलीशी माझ्याशी मैत्री कर असे बोलून छेड काढली होती. त्यानंतर मंगेश कांबळे, मंगेश्वर

भाटकर, साहील रसाळ, नागेश कदम यांनी श्रीकांत पवार याला जाब विचारत मारहाण केली. यामध्ये श्रीकांत पवार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव करत आहेत.