मुलींची छेड काढल्याने एकाला मारहाण

चिपळूण:- शहरातील जुना स्टॅण्ड परिसरात मंगळवार (दि. १) दुपारी एकाने काही मुलींशी अष्लाघ्य भाषेत बोलल्याने परिसरातील लोकांनी संबंधिताला बडदले. दोन ते तीन मुलींची संबंधिताने छेड काढल्याची चर्चा बाजारपेठेत सुरू आहे.

संबंधित मुलींनी या बाबत परिसरातील काही जागरूक लोकांना सांगताच तत्काळ त्याला पकडून त्याच ठिकाणी हिसका दाखविण्यात आला आणि पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

या प्रकरणी मुलींनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. बाजारपेठेत नखरेदीसाठी आलेल्या मुलींशी अर्वाच्य भाषेत बोलल्याने संबंधिताला जमावाने चोप दिला. या प्रकरणी पोलिस तपास करीत असून, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.