रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा येथे अवैध चालणाऱ्या मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश एकनाथ मुरकर असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २३) दुपारी चारच्या सुमारास मुरुगवाडा येथे निदर्शनास आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित अवैध मटका जुगार चालवत असताना सापडला. त्यांच्याकडून साहित्यासह १ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी योगेश शेट्ये यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.