मुरुगवाडा येथे पत्नीला दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

रत्नागिरी:- शहरालगतच्या मुरुगवाडा येथे शुल्लक कारणावरून पत्नीला दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मसद अब्दुलहमीद थालवेलकर (५१ वर्षे, रा. कांचन ओशन अपार्टमेंट, मुरुगवाडा, ता.जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबतची फिर्याद सादिका मसद थालवेलकर, (४८ वर्षे, रा. कांचन ओशन मुरुगवाडा, ता.जि.रत्नागिरी अपार्टमेंट) यांनी शहर पोलीस स्थानकात दिली. ही घटना १९ जून रोजी रात्री 9 वा.चे दरम्याने कांचन ओशन अपार्टमेंट, मरुगवाडा, ता.जि. रत्नागिरी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिका थालवेलकर या आपली बहीण आरिफा अश्रफ साखरकर (रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) हिला औषधोपचार करणेकरीता गोवा येथे घेऊन गेल्या होत्या. तेथून १९/०६/२०२४ रोजी औषधोपचार करुन २१.०० वा. घरी परत आल्या. त्यावेळी पती मसद अब्दुल हमीद धालवेलकर यास राग आल्याने सादिका यांना तू कोठे गेली होतीस असे म्हणून शिवीगाळ केली व घरातील लोखंडी रॉड घेऊन सादिका यांच्या उजव्या पायाच्या ढोपराजवळ व उजव्या हाताचे मनगटावर मारहाण करुन दुखापत केली म्हणून. याप्रकरणी सादिका धालवेलकर यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पती मसद अब्दुल हमीद धालवेलकर याच्यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करत आहेत.