मुरुगवाडा येथे गांजा बाळगल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा येथे गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमल प्रसाद पतीराम चौधरी (26) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद चौधरी हा मुरुगवाडा पांढरा समुद्र किनारी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास 58 ग्राम गांजा सदृश्य पदार्थ आपल्या ताब्यात बाळगून होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे गांजा आढळून आला. त्याच्याकडून एक मोबाईल, रोख रक्कम, एक पाउच असा एकूण 12 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल कौस्तुभ जाधव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रसाद चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.