संगमेश्वर:- संगमेश्वर जवळच्या मुचरी येथील फार्म हाऊसवर लावण्यात आलेली बोलेरो पिकअप गाडी अज्ञाताने चोरल्याची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली. अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ सप्टेंबर स. ११ ते २८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वा. च्या दरम्यान घडली. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात महबूब मुल्ला यांनी फिर्याद दाखल केली.
संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मेहबूब अब्दल लतिफ मल्ला यांची सून निहा शाहरूख मुल्ला हीचे मालकीची असलेली महिंद्रा बोलेरो पिकअप (एम एच ०८/ ए.पी.४६२३) असून पांढऱ्या रंगाची बोलेरो अज्ञाताने मालकाच्या संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने चोरून नेली.
पोलीस ठाण्यात या गाडीची किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये अशी नोंद करण्यात आली आहे. याबाबत अज्ञात चोरट्या विरूद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- याबाबत अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत शिंदे करत आहेत.









