रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर कारमधून पोलिसांनी फॉर्च्युनर गाडीतून जाणाऱ्या दोघांकडून गावठी बनावटीचे पिस्तुल आणि 5 जिवंत राउंड रत्नागिरी पोलिसांना सापडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांसह रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी हि कारवाई केली आहे.
हातखंबा येथून फॉर्च्युनर गाडीतून विना परवाना 48 हजार 500 रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्तुल आणि 5 जिवंत राउंड घेउन जाण्यार्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
ही कारवाई बुधवार 6 ऑक्टोबर रोजी पहाटे 4.40 वा.सुमारास करण्यात आली.बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. प्रेम वर्मा अलकुंटे (25) आणि सागर कुमार अलकुंटी (30,दोन्ही रा.शंकर साई मठ,हडपसर,पूणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हेड काँस्टेबल प्रविण खांबे यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानूसार,बुधवारी पहाटे हे दोघेही आपल्या ताब्यातील फॉर्च्युर गाडी (एमएच-46-एएक्स-9412) मधून हातखंबा येथील शांती ढाब्यासमोरुन जात असताना ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या गाडीची तपासणी केली असता प्रेम अलकुंटे याच्याकडे विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्टल आणि 5 जिवंत राडंड मिळून आले.याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर सुर्य करत आहेत.









