मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघातात एकजण ठार 

रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावर पनवेल जवळ झालेल्या कार अपघातात चिपळूण अलोरे येथील आलम मुल्ला जागीच ठार झाले. तर या अपघातात अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
 

सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास तुरमाळे गावाजवळ हा अपघात झाला. मुंबई कडे जाणाऱ्या लेनवर सँट्रो कारने पुढे चाललेल्या ट्रेलरला धडक दिली आणि कार त्यात अडकून पडली. त्यामध्ये अलोरे मोहल्ल्यातील आलम मुल्ला जागीच ठार झाले तर अन्य तिघेजण जखमी झाले यातील सर्वजण अलोरे मोहल्ल्यातील होते. आलम मुल्ला यांच्या अपघाती निधनाने अलोरेत सर्वाना धक्का बसला आहे.