मुंबई- गोवा महामार्गावरील बहादूरशेख येथे उड्डाणपुलाचे काम चालू असताना गर्डर तुटला

चिपळूण:- मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथे नवीन उड्डाणपुलाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान आज सकाळी चिपळूण या पुलावरील नवीन टाकलेला गर्डर कोसळला. सकाळी आठ वाजता एक मोठा आवाज होऊन बरोबर उड्डाणपुलाच्या मधोमध असलेला एक गडर क्रॅक जाऊन तुटला, त्याचे काही अवशेष हे खाली पडले. मात्र त्यावेळी उड्डाणपुलाच्या जवळ कोणीही नागरिक किंवा कोणतेही वाहन नसल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

नवीन कामाची जर ही अवस्था असेल तर या उड्डाणपुलाचे भवितव्य काय असा प्रश्न या ठिकाणी नागरिकांमधून विचारला जातोय. ज्या वेळेला या गडरचा काही भाग कोसळला त्यावेळेला त्या ठिकाणी कोणताही सेफ्टी इंजिनियर अथवा कर्मचारी उपस्थित नव्हता त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींमधून नाराज यांनी संतापही व्यक्त केला जात आहे.

पुलाच्या सेफ्टी इंजिनिअरला धक्काबुक्की

या पूल दुर्घटनेप्रकरणी पुलाच्या सेफ्टी इंजिनिअरला धक्काबुक्की झाली आहे. घटना घडल्यानंतर घटनास्थळी कोणीही हजर नव्हतं, त्यामुळे सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत.