मिरजोळे येथे ७ हजाराचा अंमली पदार्थ जप्त

रत्नागिरी:- शहराजवळी मिरजोळे-नाचणकर चाळ येथे गांजा या अमंली पदार्थाची विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन राजाराम म्हापुस्कर (वय ४०, रा. गवळीवाडा, आपकरे चाळ, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १०) रात्री सव्वाआठच्या सुमारास नाचणकर चाळ-मिरजोळे येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या गांजा सदृश्य अमंली पदार्थ विरुद्ध मोहिम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिस गस्त घालत असताना नाचणकर चाळ मिरजोळे येथे संशयित प्लास्टीक पिशवी त्यामध्ये हिरवट पाने, फुले बिया व काड्या असलेला उग्र वासाचा गांजा हा अंमली पदार्थाची विक्री करत असताना सापडला पोलिसांनी त्यांच्याकडील पिशवीसह १५७ ग्रॅमचा गांजा जप्त केला त्यांची किंमत ७ हजार २०० इतकी आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश नार्वेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.