रत्नागिरी:- मिरजोळे-पडवेवाडी येथे कौटुंबिक वादातून पत्नी व मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण करत शिवीगाळ केली. याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना गुरुवारी सायंकाळी 6.30 वा. घडली.
विजय तुकाराम पांचाळ (रा.मिरजोळे-पडवेवाडी, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पत्नी पूजा विजय पांचाळ (42,रा.मिरजोळे-पडवेवाडी, रत्नागिरी ) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
त्यानुसार, या पती-पत्नीचा घटस्फोटाचा दावा कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे पूजा आणि त्यांचा मुलगा गौरव यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. यातूनच गुरुवारी घरातील सामान बांधत असताना सिलेंडरच्या दोन टाक्यांपैकी एक टाकी गौरव बाहेर नेत होता. विजयने दोन्ही सिलेंडरच्या टाक्या माझ्या आहेत असे म्हणत लाकडी दांडक्याने पत्नी व मुलाच्या डोक्यात मारून दुखापत केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक सुर्वे करत आहेत.