रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा येथील जेटीवर गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगणार्या चार जणांना शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवार 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.45 वा.करण्यात आली असून शुक्रवारी न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
फैजान निरुद्दीन मजगावकर (27, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी),राजकुमार जगतराम राणा (28), किसन चुलवा चौधरी (32), मनीराम बाबुराम चौधरी (तिन्ही मुळ रा.नेपाळ सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या 4 संशयितांची नावे आहेत. गुरुवारी सायंकाळी शहर पोलिसांना मिरकरवाडा चेक पोस्टच्या मागे काही संशयितांकडे गांजा हा अंमली पदार्थ असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता संशयितांकडे बाराशे रुपयांचा 44 ग्रॅम गांजा मिळून आला.त्यांच्या विरोधत एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.