मिनी मंत्रालयात बदल्यांचे वारे; प्रस्थापितांच्या खुर्चीला धोका

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेत सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदल्याचे वेध लागले असून, याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही सुरू होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत विविध विभागांतर्गत पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी बदल्या होणार असून, बदली पात्र असणार्‍या अधिकार्‍यांनी सोयीस्कर नेमणुकीसाठी फिल्डिंग लावली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीत विहित कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकारी, कर्मचान्यांना मे महिना आला की बदल्यांचे वेध लागत असतात. सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा स्तरावर कार्यकाल संपलेल्या जिल्हा परिषद अधिकार्‍यांकडूनही सोयीस्कर बदली मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचप्रमाणे कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचीही माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांची प्रक्रिया राबवण्यासाठी पारदर्शकपणे प्रशासनाचा प्रयत्न आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून वारंवार आढावा घेण्यात येत आहे. बदल्यांच्या प्रक्रियेत कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी प्रशासन बारकाईने प्राप्त हा आहे.

अर्जांची छाननी करणार

दरम्यान, जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवटीत गेल्या तीन वर्षात ऐकावे ते नवलच असे म्हणण्याची वेळ आली आहे. पदाधिकारी, सदस्य नसल्याने काहीजण सुसाटपणे संचार करत असून ते काय करतात याकडे सध्या तरी कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसत आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेला वेगळी परंपरा असून, जिल्हा परिषदेचा देशभर नावलौकिक आहे. या नावलौकिकाला कुठे डाग लागू नये, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.