मित्रावर चाकूने वार करणाऱ्या आरोपीला न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वी शहरानजीकच्या खेडशी येथे घरगुती वादातून मित्रावरच धारदार चाकूने सपासप वार करणार्‍या संशयिताला न्यायालयाने शनिवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.

विनायक सुरेश हेगडे (20,मुळ रा.मिरज,सांगली सध्या रा.नॅनोसिटी खेडशी,रत्नागिरी) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.मंगळवार 11 एप्रिल रोजी सायंकाळी 7.40 वा.घरगुती वादातून विनायकने त्याचा मित्र रेहान बाबमियाँ मस्तान (36,रा.मुळ रा.मिरकरवाडा सध्या रा.नॅनोसिटी खेडशी,रत्नागिरी) याच्याशी बाचाबाची झाल्यावर आपल्याकडील चाकूने सपासप वार केले होते.यात रेहान गंभिर जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले होते.दरम्यान,या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी विनायकला तातडीने अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 15 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.शनिवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने विनायकची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.