खेडशी येथील घटना, पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- खेडशी येथे तरुण घरात झोपलेला असताना त्याची दुचाकी व मोबाईल संशयिताने पळवून नेला. मोबाईलचा वापर करुन ऐयू बॅंकेच्या अकाऊंटमधून ३३ हजाराची रक्कम पळविली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकरम शेख (रा. पनवेल) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २) दुपारी बारा ते दोन या कालावधीत गुरुनाथ कळंगुटकर यांच्या घरी, एकतानगर, खेडशी-रत्नागिरी य़ेथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दिपक चंपालाल चौधरी (वय ३३, रा. गुरुनाथ कृष्णा कळंगुटकर यांचे घरी भाड्याने, एकता नगर, खेडशी रत्नागिरी) हे त्यांच्या सोबत राहणारा संशयित अकरम शेख यांने गुरुनाथ कळंगुटकर हे घरात झोपलेले असताना त्यांच्या मालकीचा मोबाईल व दुचाकी (क्र. एमएच-०८ यु २८३१) पळविली. त्यावर तो थांबला नाही कळंगुटकर यांच्या मोबाईलचा वापर करुन फिर्यादी यांच्या ऐयु बॅंकेच्या खात्यातून ३३ हजार रुपयांची काढून फसवणूक केली. या प्रकरणी गुरुनाथ कळंगुटकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.