मालमत्ता खरेदीच्या बहाण्याने वृद्धाची ५१ लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- तालुक्यातील नेवरे येथील रो हाऊसच्या मालमत्तेची खरेदी करून देतो , असे भासवून वृद्धाची तब्बल ५१ लाख रुपयांची फसवणुकीची घटना १ जून रोजी सकाळी ११ ते २० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ७ वा . कालावधीत गणपतीपुळे येथील एका हॉटेलमध्ये घडली .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताविरोधात मिलिंद चिंतामणी दाते ( ६२ , रा . रत्नागिरी ) यांनी रविवार २० ऑगस्ट रोजी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे . त्यानुसार , संशयिताने रणदिवे नामक व्यक्तीची नेवरे येथील रो हाऊस नं . १ ही विक्री करायची असल्याचे मिलिंद दाते यांना सांगितले . त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती मालमत्ता घेण्यासाठी हे दोघेही गणपतीपुळे येथील एका हॉटेलमध्ये भेटत असत रणदिवे यांची रो हाऊसची मालमत्ता तुम्हाला मिळवून देतो , असे आमिष दाखवून संशयिताने मिलिंद दाते यांच्याकडून हॉटेलमध्ये ५१ लाख रुपये घेतले . एवढी मोठी रक्कम घेऊनही मालमत्तेचा ताबा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे दाते यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने जयगड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली . या तक्रारीवरुन संशयिता विरोधात जयगड पोलिस ठाण्यात भा.दं. वि . कायदा कलम ४२० , ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत .