मालगुंड मध्ये मंदिराची दानपेटी फोडणाऱ्या चोरट्याला न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड मराठवाडी येथील चंडीका देवी मंदिरातील दानपेटी फोडून 9 हजार 200 रुपये चोरणार्‍या संशयिताची न्यायालयाने बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

तुषार सुभाष पाटील (35,रा.मालगुंड भाटलेवाडी,रत्नागिरी) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. 23 जानेवारी रात्री 8.30 ते 29 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 4 वा. कालावधीत मालगुंड येथील चंडीका देवी मंदिरातील दानपेटी अज्ञाताने कोणत्यातरी हत्याराने फोडून त्यातील नोटा आणि नाणी असा एकूण 9 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता.याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात जितेंद्र जयवंत साळवी (49,रा.मालगुंड,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली होती.तक्रारीवरुन पोलिसांनी मंदिरातील सीसीटिव्ही फूटेज चेक संशयित चमच्याच्या सहायाने पेटीतील पैसे काढत असताना त्यांना दिसून आला होता.सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.