चिपळूण:- शहरातील धवल मार्टमध्ये तीन कामगारांनी १ लाख ६५ हजार ७९३ रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी दोन तरुणांना मंगळवारी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. बुधवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अरबाज दळवी (२०, गुहागर नाका चिपळूण), अदनान मोटलेकर (२३, धामणदेवी) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. शहरातील खंड येथील धवल घाग व्यापारी संकुल येथे असलेल्या धवल मार्टमध्ये अरबाज व अदनान तसेच एका महिलेने संगनमताने सेंसन सिस्टीम बंद करुन १ लाख ६५ हजार ७९३ रुपयांची अफरातफर केली होती. या प्रकरणी त्या दोघांना अटक करण्यात आली होती.