रत्नागिरी:- शहरातील बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय फोडले असताना आता विमा कंपनीचे कार्यालयही चोरट्यांनी फोडले असल्याचे समोर आले आहे. मारुती मंदिर परिसरात असलेले स्टार युनियन डाईची लाईफ इन्शुरन्सच्या कार्यालयात चोरी झाली. चोरट्यांनी आतील सीसीटीव्हीचे नुकसान केले असून डिव्हिआर चोरुन नेला, अशी तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
निखिल विद्याधर चव्हाण (३३, रा. रत्नागिरी) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मारुती मंदिर येथील स्टार युनियन डाय ईची लाईफ इन्शुरन्स येथे काम करतात. १४ ते १६ सप्टेंबर २०२४ या कालावधींत चोरट्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. तसेच आतील सीसीटीव्हीचा डिव्हिआर चोरुन नेला. तसेच २ सीसीटिव्ही कॅमेराचे नुकसान केले, अशी नोंद रत्नागिरी शहर पोलिसात करण्यात आली आहे.