रत्नागिरी:- नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिलेल्या आदेशानुसार रत्नागिरी शहरात अतिक्रमण हटावला सुरुवात झाली आहे. मारुती मंदिर येथून खोके हटवून या कारवाईचा श्रीगणेशा करण्यात आला.
मंगळवार सकाळपासून रस्त्यावरील फुटपाथवर असणारी अतिक्रमणे, टपऱ्या हटवण्यासाठी नगरपालिका सज्ज झाली आहे. सकाळपासून ही कारवाई सुरू झाली असून मारुती मंदिर येथील टपऱ्या उचलण्यात आल्या आहेत. यासाठी जेसीबी व इतर गाड्यांचा वापर करण्यात आला आहे.