रत्नागिरी:- किरकोळ कारणातून मित्राला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकारणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवार , ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वा. क्रांतिनगर बस स्टॉपजवळ घडली होती. राजेंद्र शिवाजी विटकर आणि रवि शिवाजी विटकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात अनिल शिवाजी कुटूवर (२८, रा. क्रांतिनगर झोपडपट्टी ) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनिल आणि संशयित एकमेकांचे मित्र आहेत. ७ दिवसांपूर्वी किरकोळ करणातून त्यांच्यात वाद झाला होता. ९ डिसेंबर रोजी अनिल कामावरून घरी जाताना त्याला आपल्या दुचाकीवरून क्रांतिनगर बस स्टॉपजवळ नेले. त्याठिकाणी अनिलला संशयितांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक भगवान पाटील करत आहेत.