खेड:- तालुक्यातील मौजे माणी येथून दि. २१ रोजी दोन जणांनी सुमारे सहा लाख रुपये किमतीच्या सागवानाच्या ३० झाडांची चोरी केली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
खेड पोलिस ठाण्यात कैलास गणपत गमरे (रा. मौजे माणी, ता. खेड) यांनी तक्रार दिली. संशयित सुरेश पांडुरंग गमरे व एक अनोळखी इसम (काळ्या रंगाचा जॅकेट घातलेला, अंदाजे वय ३० वर्षे) यांनी कामगारांच्या मदतीने ही चोरी केली. दि. २१ रोजी सकाळी ७ ते ९.१५ या मुदतीत माणी येथील जमिनीमध्ये हा प्रकार घडला.
कैलास गणपत गमरे यांच्या जमिनीत संशयितांनी अनधिकृतपणे प्रवेश केला. ३० सागाची झाडे तोडली व कामगारांच्या मदतीने ट्रॅक्टर ट्रॉलीमधून नेली. याबाबत फिर्यादींनी संशयितांना विचारणा केली असता तुम्हाला काय करायचे ते करा, असे बोलून दमदाटी केली. तू विषय वाढवलास तर तुला जड जाईल, असे बोलून जीवे मारण्याची धमकी दिली. शिवीगाळही केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. ग तपास पोलिस करत आहेत.