माजी नगरसेवक पापय धुळप यांचे निधन

रत्नागिरी:- शिवसेनेचे माजी नगरसेवक रामचंद्र उर्फ पापय धुळप यांचे मुबंईत उपचारादरमन्यान निधन झाले. रत्नागिरीत शिवसेनाच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता.

शिवसेनेचे माजी नगरसेवक पापय धुळप हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचार घेत होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शुक्रवारी रात्री उशिरा परटवणे येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे.