सात संशयितांवर गुन्हा दाखल; दोघे जण जखमी
रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथील सदानंदवाडी येथे किरकोळ वादातून दोन गटांमध्ये जोरदार गर्दी मारामारी झाली. शनिवारी (ता. २३) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत दोघे जखमी आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मांडवी येथील सुजित रतन भरणकर हे त्यांचा मित्र तुषार चौगुले यांना मोटारसायकलवरून त्यांच्या घरी सोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी वैभव हेमंत, सुर्वेदेखील त्यांच्या मोटारसायकलने तेथे पोहोचले. याच दरम्यान, संशयितांपैकी एकाने प्रकाश माईन याच्या घरासंदर्भात देवस्थान ट्रस्टमध्ये काही वाद सुरू असल्याचा राग मनात धरून संशयितांनी सुजित भरणकर आणि त्यांच्या मित्रांवर हल्ला केला. प्रियांश नागवेकर आणि शिवम पारकर यांनी लोखंडी फाईटने सुजित भरणकर यांच्या नाक, मान आणि छातीवर मारहाण केली, तर नितीन नागवेकर प्रियांश नागवेकर आणि प्रकाश माईण यांनी तुषार चौगुले यांना मारहाण केली. त्यानी वैभव सुर्वे यांनाही हाताने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत हे तुम्ही ट्रस्टला सांगा, असे बोलून धमकावले असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी प्रियांश नागवेकर, शिवम पारकर, नितीन नागवेकर, प्रकाश माईण, गणेश मोरे, प्रथमेश पावसकर आणि मयुरेश शिवलकर या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.