रत्नागिरी:- शहरातील मांडवी परिसरातून अज्ञाताने दुचाकी लांबवली. ही घटना शुक्रवार 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा.उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद विजय घुडे (43, रा. रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी प्रसाद घुडे यांनी आपली अॅक्टिव्हा दुचाकी (एमएच-08-एई-1022) मांडवी येथील आपल्या नातेवाईकाच्या घरासमोर पार्क केली होती. ती अज्ञाताने चोरुन नेल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आजुबाजुला दुचाकीचा शोध घेउन शनिवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भादंवि कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.