Monday, May 25, 2026
spot_img
Home रत्नागिरी मांडवी जेटीवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मांडवी जेटीवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

रत्नागिरी:- शहराजवळील प्रसिद्ध मांडवी जेट येथे एका महिलेने आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. स्थानिक लोकांनी प्रसंगवधान राखून महिलेला वाचवले.मात्र पाण्यात उडी मारत असताना तिच्या पायाला दुखापत झाली. नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ही घटना सोमवारी (ता. ७) रात्री नऊच्या सुमारास मांडवी जेटी येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी मारुती मंदिर येथे राहणाऱ्या एका महिलेने मांडवी येथील जेटीवर चपल काढून तिने ग्रीलच्या कठड्यावरुन पाण्यात उडी मारली. सुदैवाने समुद्राला ओहटी होती त्यामुळे ती वाचली. तिने पाण्यात उडी घेतल्याचे स्थानिक नागरिक ईशान खानविलकर यांनी हे पाहिले. ते तात्काळ तिला वाचवण्यासाठी धावले, तेथे स्थानिक नगरसेवक बंटी किर, नंदू मोरे हे ही होते. या महिलेला पाण्यातून काढून बाकावर बसवण्यात आले.उपस्थितांनी तिच्या घरच्याशी संपर्क केला. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.