महिलेवर अत्याचार करणाऱ्या संशयितास न्यायालयीन कोठडी

चिपळूण:- महिलेच्या ओळखीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या प्रौढाला चिपळूण पोलिसांनी अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

एजाज मुशताक माखजनकर (उक्ताड-बायपास) असे अटक केलेल्याचे नाव आहे. एजाज याने त्या महिलेशी शरीर संबंध ठेवत त्याचे व्हिडीओ तसेच फोटो काढले. शिवाय ते व्हायरल करण्याची धमकी देत त्या महिलेवर त्याने वारंवार अत्याचार केला. नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत त्याने एक लाख 20 हजार रुपये रोख व गुगल पेद्वारे घेतले. 7 ते 8 तोळ्याचे दागिने त्याने पीडित महिलेकडून घेतले असून ते अद्याप परत दिले नाहीत.

याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार एजाज याच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार चिपळूण पोलिसांनी अटक केली. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.