रत्नागिरी:- महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या संशयीताचा रत्नागिरी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. मुबीन इस्माईल सोलकर (रा. सोमेश्वर, रत्नागिरी ) असे संशयिताचे नाव आहे.
4 मार्च 2022 रोजी पीडित महिलेने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार मुबीनशी 2014 मद्ये पीडितेची ओळख झाली होती. महिलेचा पती नोकरीनिमित्त परदेशी असल्याचा फायदा उठवत मुबीनने पीडितेवर 2014 ते 2020 या काळात तिच्या मुलांना ठार मारण्याची धमकी देत वेळोवेळी अतिप्रसंग केला होता.
यापूर्वी पीडित महिलेने ग्रामीण पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.तेव्हा पत्नीच्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास ग्रामीण पोलीस जबाबदार असतील अशी तक्रार महिलेच्या पतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिली होती.