दुचाकीवरील महिलेला ठोकर देऊन फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल

देवरुख:- येथील सप्तलिंगीनगर येथे दुचाकीस्वाराने ऍक्टीव्हा गाडीला पाठीमागून धडक दिल्याने प्रौढ महिला जखमी झाल्याची घटना 7 डिसेंबर रोजी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातपकरणी दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र मनोहर चव्हाण (52, बौध्दवाडी, साडवली, देवरुख) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या स्वाराचे नाव आहे. तर किशोरी वासुदेव आमोणकर असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र चव्हाण हा आपल्या ताब्यातील सीडी डिलक्स दुचाकी घेऊन संगमेश्वर ते साडवली देवरुख रस्त्याने जात असताना सप्तलिंगीनगर येथे आला असता स्पीड ब्रेकरकडे दुर्लक्ष केले. यावेळी अंतर्गत रस्त्याने आलेल्या किशोरी आमोणकर यांना जोराची धडक दिली. या धडकेत आमोणकर यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. राजेंद्र चव्हाण हा ठोकर देऊन निघून गेला. या अपघात पकरणी राजेंद्र चव्हाण याच्यावर भादविकलम 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184, 134 ब / 177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.