रत्नागिरी:- महिलेच्या डोक्यात काचेची बाटली मारुन तिला गंभीर जखमी केल्याप्रकरणी प्रौढाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शनिवार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वा.सुमारास घडली.
शैलेश सुधाकर सुर्वे (५२, रा.गवळीवाड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात रसिका बबन रहाटे (४५, रा.चाफे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानूसार,त्या हॉटेलमध्ये काम करतात, शनिवारी दुपारी त्या हॉटेलच्या किचनमध्ये काम करत असताना शैलेशने तिथे येउन तिच्या डोक्यात काचेची बाटली मारुन तिला जखमी केले.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.