महिलेचा मोबाईल चोरणाऱ्या संशयितास ६ महिने कारावास

संगमेश्वर:- दादर येथून सुटणाऱ्या तुतारी एक्सप्रेस गाडीम धून प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेचा मोबाईल चोरणाऱ्या मोबाईल चोरास देवरूख न्यायालयाने. सहा महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अतुल अशोक शिर्के (रा. गुहागर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भीमराज शिवराम कांबळे राहणार परेल व त्यांची पत्नी भावना कांबळे हे २४ जुलै २०२२ रोजी दादर रेल्वे स्टेशन येथे तुतारी गाडी नंबर ११००३ डाउन बोगी नंबर एस १ बर्थ नंबर मधुन ठाणे ते संगमेश्वर रेल्वे स्टेशन दरम्यान प्रवास करत असताना भावना कांबळे यांच्या पर्समध्ये ठेवलेला मोबाईल त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन चोरीला गेला होता. या प्रकरणी अतुल शिर्के वय ३४ वर्ष राहणार मुळगाव मढाळ शिर्केवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिस उपधीक्षक शिवकुमार पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल पंदेरे करीत होते. कोर्ट पैरवी म्हणून साक्षी सचिन कामेरकर यांनी तपास केला. मोबाईल चोरी प्रकरणी आरोपी अतुल शिर्के याला देवरुख न्यायालयाने सहा महिन्याची कारावास शिक्षा सुनावली आहे संगमेश्वर पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.